वर्धा : चमत्कारिक शक्तीतून आजार बरा करण्याच्या नावाखाली फसवणूक

Wardha News : तिघांना अटक, आरोपी राजस्‍थानचे
Wardha News
फसवणूक करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्‍यात घेतले. Pudhari Photo
Published on
Updated on

वर्धा : चमत्कारिक शक्तीने आजार बरा करून देण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याचे प्रकरण शहरात उघडकीस आले. या प्रकरणात तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. तिघांनाही तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी वेगवेगळे साहित्य जप्त केले.

चमत्कारिक शक्तीने पायाचा आजार दुरूस्त करून देण्याच्या नावाखाली इसमाची तब्बल ५० हजार रुपयांनी फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. सुदामपुरी येथील ६५ वर्षीय व्यक्तीला पायाच्या गुडघ्याचा त्रास असून आराम मिळाला नाही. एका अनोळखी इसमाने चमत्कारिक शक्तीद्वारे आजार बरा करु शकत असल्याचा दावा केला. त्याने विश्वास संपादन करून ५० हजार रुपये उकळले. दुसर्‍या दिवशी मात्र पाय जैसे थे दुखत होता. दरम्यान, फिर्यादी घराबाहेर असताना एक अनोळखी पुरूष, दोन महिला घराजवळ आले असता त्यांनी गुडघ्याचा आजार चमत्कारिक शक्तीने दुरूस्त करून देण्याचा दावा केला. अगोदरच्या प्रकरणात फसवणूक झाल्‍याने फिर्यादीने तिघांचाही विचारपूस केली असता यापूर्वीची व्यक्ती त्यांचाच सदस्य असल्याचे सांगत त्‍यांनी ५० हजार रुपये परत केले. त्यांच्याकडे तीन वेगवेगळे आधार कार्ड दिसून आले. याबाबत डायल ११२ वरून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत सलाउद्दीन अब्दुल हफीज, अजीजन सलाउद्दीन हफीज खान, सायराबानो शरीफ मोहम्मद रा. बुंदी राजस्थान या तिघांना ताब्यात घेत अटक केली. आरोपींकडून पोलिसांनी वेगवेगळे साहित्यसह मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक पराग पोटे, पोलीस उपनिरीक्षक शैलेश जगताप, प्रशांत बावनकर, लोभेश गाढवे, पंकज भरणे, समीर खोब्रागडे, दयानंद धोंगडे यांनी केली.

पोलीस अधीक्षक कार्यालयात या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेला पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अप्पर पोलीस अधीक्षक सागर कवडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पराग पोटे यांची उपस्थिती होती. पोलिसांनी आरोपींकडून दुचाकी, आधार कार्ड, बँक ऑफ कोरिया नाव असलेली नोट, वेगवेगळे चार्ट, तेल, पावडर, गोळ्या आदी साहित्य जप्त केल्याची माहिती देण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news