

वर्धा : वर्धा जिल्ह्यातील सेलू येथे मांडूळ सापाची तस्करी करणाऱ्या पाच जणांना सोमवारी (दि.२४) पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई सेलू पोलिस व वनविभागाने संयुक्तपणे केली. मांडूळ सापासह कार पोलिसांनी जप्त केली.
याबाबत अधिक माहिती अशी, सेलू येथे मांडूळ सापाची तस्करी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सेलू पोलिस व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागपूर-तुळजापूर महामार्गावरील सेलू बायपास येथे सापळा रचून कार (क्र. एम.एच. ३० ए.एफ.८४६९) ची तपासणी केली. या कारमधील पिशवीत मांडूळ साप आढळला. त्यानंतर पोलिसांनी केशव लक्ष्मण भराडी (रा. पातुर, जि. अकोला), सिद्धार्थ धोंडबा कांबळे (रा. रिधोरा, जि. वाशिम), मजहर हक मोहम्मद जाफर मालवी (रा. मालेगाव जि. वाशिम), तुकाराम ज्ञानेश्वर छापे (रा. हिंगणा जि. नागपूर), अनिलकुमार पंचानन नायक (रा. बालीबिल, ओडीसा), या पाच जणांना ताब्यात घेतले. ही कारवाई प्रभारी ठाणेदार यशवंत सोळसे, मनोहर मुडे, निरंजन वरभे, अखिलेश गव्हाणे, सचिन वाटखेडे, योगेश सोरते यांनी केली.