El Nino Crop Impact | एलनिनोमुळे कापूस, तूर, सोयाबीन पिकांची परिस्थिती बदलण्याची शक्यता

पालक सचिव मिलिंद म्हैसकर यांनी घेतला संभाव्य दुष्काळ परिस्थिती व विकासकामांचा आढावा
Wardha Agriculture News
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित संभाव्य दुष्काळी परिस्थिती व जिल्ह्याच्या विविध विकासकामांच्या आढावा बैठकीत बोलताना पालक सचिव मिलिंद म्हैसकर Pudhari
Published on: 
Updated on: 

Wardha Cotton Crop Update

वर्धा: एलनिनोच्या प्रभावामुळे पावसामध्ये खंड व तुट दिसून येत आहे. कमी पावसामुळे कापूस, तूर व सोयाबीन पिकांची परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य परिस्थितीचा विचार करून प्रशासनाने काळजीपूर्वक व नियोजनबद्ध पद्धतीने काम करणे आवश्यक आहे, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाचे अप्पर मुख्य सचिव तथा पालक सचिव मिलिंद म्हैसकर यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित संभाव्य दुष्काळी परिस्थिती व जिल्ह्याच्या विविध विकासकामांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. 

यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपवनसंरक्षक हरवीर सिंह, अपर जिल्हाधिकारी संजय तेली, उपविभागीय अधिकारी कुश मोटवाणी, भारतीय प्रशासकीय सेवेतील परिविक्षाधीन अधिकारी शोभिका पाठक, निवासी उपजिल्हाधिकारी राजू रणवीर यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

Wardha Agriculture News
Wardha News : वर्धा जिल्ह्यात ५६.७ लाखांच्या ५२९ वीजचोर्‍या उघडकीस!

जिल्ह्यातील कृषी क्षेत्राचा आढावा घेताना कापूस, तूर व सोयाबीन या प्रमुख पिकांच्या बदलत्या परिस्थितीवर प्रशासनाने लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे म्हैसकर यांनी सांगितले. जिल्ह्यातील बहुतांश तालुके दुष्काळी तालुक्यांच्या ट्रिगर-1 (प्रथम काळ) मध्ये समाविष्ट असल्याने संबंधित यंत्रणांनी परिस्थितीचा बारकाईने आढावा घेऊन आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. सिंचन क्षमतेत वाढ करण्यासाठी सुरू असलेल्या विविध योजनांचा प्रभावीपणे पाठपुरावा करण्याचे निर्देश त्यांनी जलसंधारण विभागाला दिले.

आरोग्य क्षेत्राचा आढावा घेताना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून अधिकाधिक नागरिकांना लाभ मिळवून देण्यावर भर देण्याचे त्यांनी सांगितले. हिंगणघाट येथील दोन रुग्णालये कार्यान्वित झाल्यानंतर तसेच सेवाग्राम, सावंगी आणि इतर वैद्यकीय संस्थांमुळे वर्धा जिल्हा वैद्यकीय सुविधांचे महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून विकसित होत आहे. या पार्श्वभूमीवर शासकीय रुग्णालयांमध्ये आयुष्मान योजनेचा प्रभावीपणे वापर वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे पालक सचिव म्हैसकर यांनी सांगितले.

Wardha Agriculture News
Wardha News : दंडात्मक कारवाईमुळे संतापलेल्या चालकाने समृद्धीवर रोखली वाहतूक, ट्रक आडवाच उभारल्याने वाहतुकीचा खोळंबा

बोर वन्यजीव अभयारण्याच्या विकासासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना गती देण्याची गरज आहे. ताडोबा व पेंच या व्याघ्र प्रकल्पांवरील पर्यटकांचा वाढता प्रवाह पाहता बोर व्याघ्र प्रकल्प पुढील महत्त्वाचे व्याघ्र व वन्यजीव पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना वनविभागाला दिल्या.

जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी जिल्ह्यातील विविध विकास प्रकल्प, उद्योग, रोजगार, कृषी, सिंचन, आरोग्य, वनविभागासह विविध क्षेत्रातील कामांची सविस्तर माहिती पालक सचिवांना दिली. बैठकीत जिल्ह्यातील कृषी, सिंचन, उद्योग, रोजगार, आरोग्य, वन, पायाभूत सुविधा तसेच विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. संबंधित विभागांनी निर्धारित उद्दिष्टे वेळेत पूर्ण करून नागरिकांना योजनांचा प्रभावी लाभ मिळवून देण्यासाठी समन्वयाने काम करण्याचे निर्देश पालक सचिवांनी दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news