

Wardha Accident News
वर्धा : चारचाकी वाहन अनियंत्रित होऊन झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर तीन जण जखमी झाले. हा अपघात रविवारी (दि.२५) दुपारी वर्धा-नागपूर मार्गावर रमणा गावाजवळ घडला.
नागपूर येथून आर्वी तालुक्यातील चिंचोली येथे जात असताना रमणा गावाजवळ चालकाचे अचानक वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे चारचाकी वाहन रस्त्याचे कडेला उलटले. यात वाहनातील लक्ष्मण श्यामरावजी कोंबे (वय ६०) यांचा जागीच मृत्यू झाला. जखमीमध्ये सुरेश शंकर ठाकरे (रा. हिंगणघाट), नरेश मारोती ठाकरे (रा. नागपूर), आशिष महल्ले यांचा समावेश आहे.
घटनेची माहिती मिळताच जखमींना रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनास्थळी सेलू पोलीसांनी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. महामार्ग पोलिस मदत केंद्र जामचे पोलिस उपनिरीक्षक दिलीप थाटे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी भेट दिली. याप्रकरणी पुढील तपास सेलू पोलीस करीत आहे.