

Wardha Monsoon Update
वर्धा : जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात पावसामध्ये मोठी अनियमीतता दिसून येते. तीन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत सुमारे ३१ टक्के पावसाची तूट नोंदविण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यात मोठी तूुट असल्याने चिंतेत भर पडली आहे. सप्टेंबरमधील पावसाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
वर्धा जिल्ह्यात जून ते ऑगस्ट या कालावधीत सरासरी ७१९.३ मिलिमीटर पर्जन्यमान अपेक्षित आहे. मात्र यावर्षी पावसाळ्याच्या या तीन महिन्यांत ४९०.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तीन महिन्यात सरासरीच्या तुलनेत केवळ ६८.२ टक्के पाऊस झाला झाल्याची नोंद आहे.
वर्धा जिल्हा्यातजून महिन्याचे सरासरी पर्जन्यमान १७४.१ मिलिमीटर आहे. जूनमध्ये १३२.२ मिलिमीटर पाऊस झाला असून सरासरीच्या ७५.९ टक्के पाऊस झाला. जुलै माहिन्यात सरासरीच्या १०९.६ टक्के पाऊस झाला. यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला.
मात्र, ऑगस्टमध्ये केवळ ६०.६ मिलिमीटर पाऊस झाला. ऑगस्टमध्ये सरासरीच्या अवघ्या २२.३ टक्के पावसाची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील पर्जन्यमानाची तूट मोठ्या प्रमाणात वाढली. आगामी काळात सर्वना दमदार पाऊस अपेक्षित आहे.