Vijay Wadettiwar | दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घेऊन दुष्काळग्रस्तांसाठी भरीव पॅकेज जाहीर करावे : विजय वडेट्टीवार

शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले विजय वडेट्टीवार 
Vijay Wadettiwar
पारडी शिवारात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून पीक परिस्थितीची पाहणी केलीPudhari
Published on: 
Updated on: 

Maharashtra Drought Relief Package

वर्धा : सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे. अन्यथा शेतकऱ्यांचे जगणे कठीण होईल. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारने दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घेऊन तातडीने भरीव पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.

कारंजा (घाडगे) तालुक्यातील पारडी शिवारात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून पीक परिस्थितीची पाहणी केली. कपाशीच्या शेतात जाऊन त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी आणि व्यथा जाणून घेतल्या. पावसाअभावी कपाशीचे पीक सुकत असून उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता असल्याचे शेतकऱ्यांनी वडेट्टीवार यांना सांगितले. पाणी नसल्याने झाडे सुकत आहेत. एकरी एक क्विंटल कापूस होईल की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी व्यथा शेतकऱ्यांनी मांडली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने सरसकट एकरी एक लाख रुपये मदत द्यावी, अशी मागणीही करण्यात आली.

Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar | कंत्राटातून मलिदा लाटणाऱ्या ‘ठेकेदार आमदाराला’ जनतेच्या समस्यांची काय जाणीव? : विजय वडेट्टीवार

कारंजा (घाडगे) तालुका दुष्काळाच्या यादीतून बाहेर राहिल्याने सरकारची भूमिका नेमकी काय, असा सवाल उपस्थित करत हा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे करणार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढा, असे विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले. भेटीदरम्यान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील कोल्हे, अभ्युदय मेघे, अनंता मोहोड यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्त्यांची तसेच शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news