

वर्धा : वरुड येथून आर्वी येथे प्रवासी घेऊन जाणाऱ्या वरुड आगाराच्या एसटी बस साहूर शिवारात टोल नाक्यावर पावणेपाच वाजताच्या सुमारास दुभाजकाला धडकली. स्टेअरिंग लॉक झाल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येते. बसमधील चार ते पाच जण किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात येते.
मिळालेल्या माहितीनुसार, वरुडकडून प्रवासी घेऊन जाणारी बस आर्वीला जात होती. या बसमध्ये जवळपास सात प्रवासी होते. वरुड आर्वी मार्गावर साहूर शिवारात बसचे स्टेअरिंग अचानक लॉक होऊन टोल नाक्याजवळ बस दुभाजकाला धडकली. बसचे स्टेअरिंग अचानक लॉक झाल्याने ही घटना घडल्याचे सांगण्यात येते. बसचालकानी बसवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. पण स्टेअरिंग लॉक झाल्याने अनियंत्रित बस टोल नाक्याच्या दुभाजकावर धडकली. बसमधील चार ते पाच जणांना किरकोळ इजा झाली. याबाबत चालकाने पोलिसांना माहिती दिल्याचे सांगण्यात येते. वरुड - आर्वी बस टोल नाक्याच्या दुभाजकाला धडकली.