
Vardha ASHA Workers Protest
वर्धा : आशा, गटप्रवर्तकांना पाच महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही. त्यामुळे आशा, गटप्रवर्तकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मानधन न मिळाल्यास कामबंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटना जिल्हा शाखेच्या वतीने आयटक राज्य सचिव दिलीप उटाणे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आला आहे. त्यामध्ये मासिक बैठक व शासकीय कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मागील पाच महिन्यापासून आशा, गट प्रवर्तक यांना मानधन मिळाले नसल्याने आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आशा, गट प्रवर्तक यांचे थकीत मानधन देण्यात यावे, दरवर्षी राज्य सरकार आशा व गटप्रवर्तक यांना दोन गणवेश द्यायचे. परंतु या वर्षात ग्रामीण भागातील आशा व गटप्रवर्तकांना फक्त एकच गणवेश दिलेला आहे. ते नेहमीप्रमाणे दोन गणवेश देण्यात यावे, आशा व गटप्रवर्तकांचा गणवेशचा रंग बदलवू नये, सरकारने जुनाच गणवेश ठेवावा आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री, मंत्री व राज्यमंत्री सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या नावाने निवेदन देण्यात आले.
यावेळी दिलीप उटाणे यांच्यासह ज्योत्स्ना राऊत, शबाना शेख, प्रमिला वानखेडे, प्रतिभा वाघमारे, सुजाता भगत, रेखा तेलतुंबडे, विना पाटील, प्रमिला वानखेडे, प्रतिभा वाघमारे, उज्वला नाखले, रेखा तेलतुंबडे, शालिनी थूल, पुष्पा शंभरकर, वृषाली कडू, मंगला बावणे, आम्रपाली बुरबुडे, मंजू शेंडे, ज्योत्स्ना मुंजेवार, शारदा जोगवे, सविता ढोले, वर्षा पाल, उषा ठोंबरे, ममता परतेकी, गीता दुतकोर, स्मिता वरकडे, अश्विनी भोयर, मनीषा धुर्वे, वंदना मेश्राम, अलका शंभरकर, सोनाली खेडकर, अर्चना पोहाणे, कविता बलवीर, वृषाली नोकरकर, अर्चना सावरकर, अनिता बागडे, दुर्गा वाघमारे, लता बनाईत, रूपाली बावणे, वंदना वावरे, सुनंदा मुळे आदींची उपस्थिती होती. शासनाने आठ दिवसात थकीत वेतन दिल्यास बेमुदत संप करण्याचा इशाराही याप्रसंगी आयटकच्या वतीने देण्यात आला आहे.