वर्धा : जिल्ह्यातील 18 आरोग्य उपकेंद्राचा होणार कायापालट

पालकमंत्री भोयर यांचा पुढाकार, इमारत बांधकामासाठी 11 कोटींचा निधी मंजूर
वर्धा : जिल्ह्यातील 18 आरोग्य उपकेंद्राचा होणार कायापालट
File Photo
Published on
Updated on

वर्धा : ग्रामीण भागात रूग्णांची वाढती संख्या व त्या तुलनेत सुविधांची कमी, अपुरा परिसर यामुळे अनेक अडचणी येत होत्या. मात्र पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या पुढाकारामुळे आता प्राथमिक आरोग्य केंद्राशी संलग्नित उपकेंद्रांचा कायापालट होणार आहे. जिल्ह्यातील 18 आरोग्य उपकेंद्राच्या इमारत बांधकामासाठी 11 कोटी 1 लक्ष रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातंर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा देण्यात येतात. या सुविधांसाठी मंडल केंद्रावर प्राथमिक आरोग्य केंद्र व त्या अधिनस्थ उप आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यात 28 प्राथमिक आरोग्य केंद्र असून त्या अंतर्गत 181 आरोग्य उपकेंद्र आहेत. या केंद्रामधून ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा दिल्या जातात. उपकेंद्राची जागा अपुरी असण्यासोबतच सुविधा कमी असल्याची नेहमी तक्रार होती. परंतु आता पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या पुढाकारामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातीत सुविधांमध्ये वाढ होणार आहे. त्यांच्या प्रयत्नामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत 15 व्या वित्त आयोगातून आरोग्य उप केंद्राच्या इमारतीसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.

या आरोग्य उपकेंद्राची होणार इमारत

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातंर्गत असलेल्या सेलू तालुक्यातील पळसगाव (बाई), आकोली, बोरी (कोकाटे), केळझर, देवळी तालुक्यातील मुरदगाव (खोसे), इंझाळा, अंदोरी, नांदोरा (डफरे), हिवरा (गुंजखेडा), आष्टी तालुक्यातील खडकी, माणिकवाडा, कारंजा तालुक्यातील चांदेवाणी, काकडा, माळेगाव (ठेका), गारपीट, हिंगणघाट तालुक्यातील नांदगाव, समुद्रपूर तालुक्यातील पेठ, वर्धा तालुक्यातील करंजी (भोगे) येथील आरोग्य उप केंद्राच्या इमारतीसाठी प्रत्येक केंद्र निहाय 58.275 लक्ष रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच वर्धा येथे नवीन बी.पी.एच.यु.इमारत बांधकामासाठी 52.5 लक्ष रूपयांचा असा 1101.45 लक्ष रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या कामांना प्रशासकीय मान्यता देखील देण्यात आली आहे.

आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी प्रयत्न

ग्रामीण भागातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्र व उप केंद्राची मोठा आधार असतो. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. यापुर्वी 32 प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आवश्यक असणारे निर्जतुकीकरण जंतुनाशक उपकरणे खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. आता 18 उपकेंद्रासाठी व वर्धा येथे नवीन बी.पी.एच.यु.इमारत बांधकामासाठी निधी मंजूर करून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
डॉ. पंकज भोयर, पालकमंत्री वर्धा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news