The police have arrested the burglary gang.
घरफोडी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे.Pudhari Photo

वर्धा : बोरगाव येथे घरफोडी करणारी टोळी जेरबंद

सहा लाख ४४ हजारांचा मुद्देमाल जप्त

वर्धा, पुढारी वृत्तसेवा : बोरगाव येथे घरफोडी करुन सोने आणि 6 लाख 44 हजारांची रोकड चोरांनी लपास केली होती. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी झडती घेत तीन संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच घरफोडीत चोरी झालेले 110 ग्रॅम सोने आणि 6 लाख 44 हजार 400 रोख रक्कम असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली आहे.

The police have arrested the burglary gang.
बीड : हिंगणीत घरफोडी; आठ लाखाचा मुद्देमाल पळविला

बोरगाव येथे झालेल्या घरफोडी प्रकरणात पोलिसांनी भिमसिंग सबजीतसिंग टाक (वय ३२, रा. गिट्टीखदान बोरगाव), जंगसिंग पंजाबसिंग टाक (वय ३३, रा. वडनेर, ता. हिंगणघाट) आणि सतनामसिंग प्रतापसिंग बावरी (वय ३० रा. शेंदला ता. मेहकर जि. बुलढाणा) या तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींच्या ताब्यातून 3 लाख रुपये किंमतीच्या सोन्याच्या चार बांगड्या, 2 लाख 50 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे बिस्कीट, 34 हजार 400 रुपये रोख, असा एकूण 6 लाख 44 हजार 400 रुपयांचा मुद्देलाल जप्त केला.

The police have arrested the burglary gang.
देवळा येथे भरदिवसा 12 लाखांची घरफोडी

ही कारवाई पोलीस अधीक्षक नूरूल हसन, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या निर्देषानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक अमोल लगड, सलाम कुरेशी, नरेंद्र पराशर, सचिन इंगोले, प्रमोद पिसे, रामकीसन इप्पर, नितीन ईटकरे, संघसेन कांबळे, अरविंद इंगोले, मिथुन जिचकार, दिनेश बोथकर यांनी केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक पराग पोटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार प्रशांत वंजारी, पंकज भरणे, श्रावण पवार, वैभव जाधव करीत आहेत.

logo
Pudhari News
pudhari.news