Wardha Crime | गांजासह दोन लाख ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त
Ganja Seizure Wardha
वर्धा : पोलिसांनी अमली पदार्थ गांजा विक्रेत्यावर दोन ठिकाणी कारवाई करत दोन लाख ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
स्थानिक गुन्हे शाखेने गोपनिय माहितीवरून शिवनगर ते हमदापुर रोडवर सापळा रचुन एन.डि.पी.एस. अॅक्ट अंतर्गत कार्यवाही केली. त्यावेळी हरिष व्यंकटराव मोहिते, रा. शिवनगर, ता. सेलू यास पोलीसांची चाहुल लागताच त्याने मोटर सायकल जागीच सोडून पसार झाला. त्याचा साथीदार मनीष गणेश मोहिते रा. शिवनगर ता. सेलू यास ताब्यात घेवुन झडती घेतली असता २१,२४० रुपये किमतीचा १ किलो ६२ ग्रॅम वजनाचा गांजा अंमली पदार्थ व मोटारसायकल असा २ लाख २१ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
दोन्ही आरोपींविरोधात दहेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जप्त मुद्देमाल व आरोपीस दहेगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
पोलीस स्टेशन वर्धा शहर हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेच्या दुसर्या पथकाने सिद्धार्थ नगर येथे अमित ऊर्फ जॉन हरिभाऊ उके याच्या राहते घरी गांजाबाबत छापा टाकला. त्याच्या घर झडतीमध्ये ७५८ ग्रॅम गांजा मिळून आला. याप्रकरणी आरोपीविरुद्ध पोलिस स्टेशन वर्धा शहर येथे गुन्हा नोंद करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांच्या निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोलिस उपनिरीक्षक उमाकांत राठोड, सलाम कुरेशी, अरविंद येनुरकर, हमीद शेख, सचिन इंगोले, प्रमोद पिसे, अमर लाखे, अमर पाटील, रोशन निबोंळकर, श्रीकांत खडसे, रवि पुरोहित, अभिषेक नाईक, विनोद कापसे यांनी केली.