

वर्धा : घरफोडीचा गुन्हा उघड करत आरोपीला पोलिसांनी अटक केली. सेवाग्राम पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकाने ही कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार, धानोरा येथे अज्ञात इसमाने घराचे दरवाज्याचे कडी-कोंडा तोडून नगदी 12 हजार रुपये, सोन्याची अंगठी व चांदीच्या तोरड्या असा 19 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता.
याप्रकरणी सेवाग्राम पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी विनोद सुरेश गुरनुले (वय 34), रा. सालईधाभा, ता. हिंगणा, जि. नागपूर, ह.मु. धानोरा, ता. जि. वर्धा याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्हा केल्याची माहिती पुढे आली. आरोपीकडून अंगठी, तोरड्या व 3 हजार रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक नागेशकुमार चतरकर यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकातील अंमलदार संजय लाडे, हरिदास काकड, स्वप्नील मोरे, धीरज मिसाळ व प्रदीप कुचनकर यांनी केली.