नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्यांना अटक 

Vardha News
नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्यांना अटक AI Photo
Published on
Updated on

वर्धा : Vardha News | नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक प्रकरणातील आरोपींना जेरबंद करत दोन लाख ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सायबर पोलिसांनी ही कारवाई केली. 

आष्टी येथील युवकाने मोबाईलवर नोकरी डॉट कॉम येथे महिंद्रा अ‍ॅन्ड महिंद्रा कंपनीमध्ये जीटी इंजीनिअर या पदाच्या जागा रिक्त असल्याची जाहिरात पाहिली आणि नोकरीकरीता अप्लाय केला. त्यासंबंधाने फिर्यादीस कॉल आला व आपल्याला मुलाखतीकरीता मेल प्राप्त होईल, त्याकरीता वेगवेगळ्या कारणास्तव १ लाख ३८हजार ४५० रुपये भरायला सांगून नोकरी संबंधाने फसवणूक केली.

याप्रकरणी तक्रारीवरून सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तांत्रीिक पद्धतीने तपास केला. पोलिसांच्या पथकाने तपास करत वाराणसी येथे छापा टाकला असता कुमार मदनमुरारी सिंह (वय ३३) रा. कुरथॉल, रोशनकुमार अखिलेशकुमार सिंह (वय ३०) रा. पटेलनगर दोघेही सध्या राहणार शांतीनगर कॉलोनी वाराणसी, उत्तर प्रदेश हे लोकांची फसवणुक करत असताना रंगेहात मिळून आले. आरोपींना ताब्यात घेवुन त्यांच्या ताब्यातुन १ नोटपेड, ८ मोबाईल, ३ लॅपटॉप, ३ एटीएम कार्ड व रोख १ लाख १९ हजार रुपये असा २ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत गुन्हा उघडकिस आणला.

पोलिस पथकाने सतत चार दिवस आरोपींची माहिती काढून आरोपी निष्पन्न केले. आरोपी पाच रुमचे घर भाडे तत्त्वावर घेऊन तेथून फसवणुकीचे गुन्हे करत होते. तेथे छापा टाकून आरोपींना ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनात व निर्देशाप्रमाणे पोलिस उपनिरीक्षक प्रकाश लसुंते, पोलीस अंमलदार निलेश तेलरांधे, दिनेश बोथकर, वैभव कट्टोजवार, अमित शुक्ला, अनुप कावळे, रंजीत जाधव, अनुप राऊत, प्रतिक वादीले, पवन झाडे, लेखा राठोड, आरती पारीसे यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news