वर्धातील अभ्युदय मेघेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश; राजकिय क्षेत्रात खळबळ

नाना पटोलेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
Abhuday Meghen's entry into Congress
अभ्युदय मेघेंचा काँग्रेसमध्ये प्रवेशPudhari Photo
Published on
Updated on

भाजप नेते तथा माजी खासदार दत्ता मेघे यांचे पुतणे अभ्युदय मेघे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे वृत्त पसरताच राजकिय वर्तुळात चांगलीच खळबळ निर्माण झाली. यामुळे अनेक राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Abhuday Meghen's entry into Congress
Nagpur Politics : विदर्भात भाजपला मोठा धक्का; ‘या’ नेत्याचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

मुंबई येथे गुरुवारी (दि.8) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत अभ्युदय मेघे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अभ्युदय मेघे यांच्या काँग्रेसमधील प्रवेशानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. विदर्भातील राजकारणात महत्त्वाचे स्थान असलेल्या मेघे कुटुंबातील सदस्याचा प्रवेश काँग्रेसमध्ये झाला.

Abhuday Meghen's entry into Congress
लवकरच राज्यातील अनेक मोठ्या चेहऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश : नाना पटोले

दरम्यान दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्थेच्या विशेष कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी अभ्युदय मेघे यांच्याकडे होती. या पदाचा राजीनामा दिल्याचे अभ्युदय मेघे यांनी सांगितले. अभ्युदय मेघे यांनी अचानक हा निर्णय घेतल्याने आश्चर्याचा धक्का बसला आहे. माजी खासदार दत्ता मेघे यांचे पुतणे, सागर मेघे यांचे चुलत भाऊ असलेले अभ्युदय मेघे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना मदतीसह विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. वर्धा विधानसभेकरिता उमेदवारीची मागणी केली असल्याचं सांगण्यात येते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news