दिवाळी हंगामात एसटीच्या वर्धा विभागाला 3 कोटी 15 लाखाचे उत्पन्न

दिवाळी हंगामात एसटीच्या वर्धा विभागाला 3 कोटी 15 लाखाचे उत्पन्न
वर्धा; पुढारी वृत्तसेवा : प्रवासी सेवेमध्ये अग्रेसर असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वर्धा विभागाने दिवाळी सणानिमित्त प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी अतिरिक्त बसेसची व्यवस्था केली होती. त्याला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद लाभला. या दरम्यान 3 कोटी 15 लाखाचे उत्पन्न महामंडळास मिळाले.
दिवाळीनिमित्त 10 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत वर्धा येथून पुणे, नांदेड, छत्रपती संभाजीनगर येथे येणारे व जाणारे प्रवासी तसेच इतर जिल्ह्यात, तालुक्यात व ग्रामीण भागात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी अतिरिक्त फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले होते. या कालावधीत या अतिरिक्त फेऱ्यांद्वारे 8 लाख 97 हजार 232 किमी वाहन चालवून तब्बल 3 कोटी 15 लाख 6 हजार इतके भरघोस उत्पन्न प्राप्त केले.
याव्यतिरिक्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडाळातर्फे देण्यात येणाऱ्या सवलतीमध्ये महिला सन्मान योजनेंतर्गत 50 टक्के सवलतीत 5 लाख 30 हजार 721 महिलांनी प्रवास केला. त्यामधून 4 कोटी 33 लाख 9 हजार, अमृत जेष्ठ नागरिक 100 टक्के सवलत योजनेंतर्गत  1 लाख 54 हजार 320 जेष्ठ नागरिकांनी प्रवास केला. त्यामधून 72 लाख 15 हजार व जेष्ठ नागरिक 50 टक्के सवलत या योजनेंतर्गत 69 हजार 372 जेष्ठ नागरिकांनी प्रवास केला असून त्यामधून 18 लाख 64 हजार उत्पन्न प्राप्त झाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news