गडकरी धमकी प्रकरण : पाशाचे नागपूर कनेक्शन, पोलिसांपुढे आव्हान

गडकरी धमकी प्रकरण : पाशाचे नागपूर कनेक्शन, पोलिसांपुढे आव्हान
Published on
Updated on
नागपूर; पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या खंडणी प्रकरणात जयेश पुजारी आणि अफसर पाशा या दोघांचा कटात सहभाग असल्याचे समोर आले असले तरी लवकरच आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. पाशा यापूर्वी दोनदा नागपुरात आले असल्याने त्याचे नागपूर कनेक्शन नागपूर पोलिसांपुढे आव्हान आहे.
तूर्तास १९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी असली तरी तपासादरम्यान पाशाचा पीसीआर वाढवण्यासाठी प्रयत्न केला जाईल. तसेच गरज पडल्यास पहिला आरोपी जयेश पुजारीला सुद्धा पुन्हा पीसीआरमध्ये घेऊन दोघांची एकत्र विचारपूस करून तपास केला जाईल. या प्रकरणात दोघांचाही कटात सहभाग होता हे समोर आले आहे. यात अफसर पाशा हा काही वर्षांपूर्वी नागपुरात एकापेक्षा अधिक वेळा येऊन गेला होता. तो नागपुरात आला होता अशीही माहिती समोर येत आहे. पोलिस यासंदर्भात विस्तृत माहिती घेत आहेत. नागपुरात काही लोकांशी पाशाचा  संपर्क होता यामुळे  तपासात आणखीही काही आरोपी होऊ शकतील अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी आज सोमवारी माध्यमांशी बोलताना दिली. जम्मू काश्मीरमधील लष्कर ए तोयबासारख्या दहशतवादी संघटनांशी  संबंधित अफसर पाशाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी धमकी प्रकरणात बेळगाव येथून नागपूर पोलिसांनी प्रोडक्शन वारंटवर नागपुरात आणले आहे. अफसर पाशा हा चार दिवसांच्या पोलीस कोठडीत आहे. मुंबई एनआययेने मागणी केल्यानुसार मधल्या काळात न्यायाल्यांर्फत एनआयएकडे तपास हस्तांतर केल्यास ते पुढील निर्णय घेतील. याविषयी बेळगाव येथे पथक दोन तीनदा  जाऊन आले आहे.बेळगाव येथील कारागृहातील आरोपीची विचारपूस झाली आहे. यात अधिक तपास सुरू आहे. अनेक स्टेट एजन्सी मिळून तपास करीत असून विशेष पथक वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तपास करी त असल्याचे अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news