मुली-महिलांच्या सुरक्षेबाबत राज्य सरकाने गंभीर पाऊले उचलावीत : रुपाली चाकणकर

मुली-महिलांच्या सुरक्षेबाबत राज्य सरकाने गंभीर पाऊले उचलावीत : रुपाली चाकणकर

वाशीम, पुढारी वृत्तसेवा : राज्यात बेपत्ता झालेल्या मुली व महिलांचा शोध घेण्यासाठी व त्यांच्या सुरक्षितेसाठी राज्य सरकारने गंभीर उपाय योजना करावी, अशी मागणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केली आहे. रुपाली चाकणकर यांनी याबाबतची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे केली आहे.

सदर मागणी निवेदनात असे नमूद केले कि, गेल्या काही दिवसांत विविध वृत्तवाहिन्या व समाजमाध्यमांवर राज्यातील महिला व मुली बेपत्ता होत असल्याबाबतच्या बातम्या प्रसारित होत आहेत. महिलांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. मी जानेवारी २०२२ मध्ये पोलिस उपायुक्त, हरविलेल्या व्यक्ती विभाग, स्पष्ट भायखळा, मुंबईकडे विचारणा केली असताना त्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत.

मात्र अजुनही महिला व मुली बेपत्ता होत असल्याबाबतच्या बातम्या सातत्याने येत आहेत. राज्यातील महिलांना सुरक्षिततेचे वातावरण तसेच त्यांचा आत्मविश्वास कायम रहावा यासाठी संबंधित यंत्रणांना सूचना कराव्यात, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news