B Tech च्या विद्यार्थाचा वर्धा नदीत बुडून मृत्यू

B Tech च्या विद्यार्थाचा वर्धा नदीत बुडून मृत्यू

नदीकाठावर असलेल्या मंदिरातील देव दर्शनासाठी गेलेल्या बिटेकच्या विद्यार्थ्यांचा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज (सोमवार) वर्धा नदीच्या पात्रात घडली. प्रफुल्ल राजम कोंकटी असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, तो नकोसा येथील रहिवासी होता. तो दिवाळी सणा निमित्त आपल्या कुटुंबासह राम मंदिर दर्शनाला गेला होता.

परिसरातील वर्धा नदीत आई – बहिणीसह आंघोळीचा आनंद घेत असताना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तो नदी पात्रात बुडाला. ही घटना आज (सोमवार) सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान घडली. दिवाळीच्या पहिल्या दिवशीच तरुण होतकरू युवकाच्या दुर्दैवी निधनाने संपूर्ण नकोसा गावात शोककळा पसरली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news