दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत चंद्रपूरच्या धावपट्टूने मिळविले कांस्यपदक

दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत चंद्रपूरच्या धावपट्टूने मिळविले कांस्यपदक

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा :  दक्षिण आफ्रिकेतील पीटरमरिझबर्ग येथे नुकत्याच पार पडलेल्या ८९ किलोमीटरच्या कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथील भूमिपुत्र सागर कावळे (वय ४७) या धावपटूने कांस्यपदरक मिळविले आहे. ८९ किमीची ही स्पर्धा १० तास १ मिनिटात पूर्ण केली आहे. भारतातील ९० टक्के स्पर्धकांनी ही पूर्ण केली आहे. ही मॅरेथॉन जगातील सर्वात कठीण स्पर्धा समजली जाते. यावर्षी जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. जगातील अगदी मोजके धावपटू या कॉम्रेड स्पर्धेसाठी पात्र ठरले होते. सेंट पिटरमरिझबर्ग ते डर्बन या शहरा दरम्यानच्या ९० किमी अंतरासाठी ही स्पर्धा ११ तास ४५ मिनिटात पूर्ण करणे गरजेचे असते.

चिमूर येथील भूमिपूत्र सागर कावळे यांनी हे अंतर १० तास १ मिनिटात पूर्ण केली. दरम्यान, या स्पर्धेत यावर्षी संपूर्ण भारतातील ४०३ धावपटू (Runner) सहभागी झाले होते. सागर कावळे या धावपटूने अनेक महिन्यांच्या परिश्रमानंतर ही स्पर्धा पूर्ण केली आहे. तसेच सतत वर्षभरापासून तयारी केली होती. पहाटे उठून शारिरीक स्वास्थ्याबरोबर मानसिक स्वास्थ कसे सुदृढ राहील याकडे लक्ष केंद्रीत केले होते. नियमित सरावाबरोबर अप हिल व डाऊन हिल असे प्रकार ते करीत होते. दररोज ठराविक अंतर तर रविवारी लॉँग रनचा सराव त्यांनी केला होता.या स्पर्धेच्या पात्रतेसाठी तीन सराव वर्ग करणे बंधनकारक असते, यातील दोन सराव वर्ग भारतातील लोणावळा व एक सराव वर्ग लवासा येथे आयोजित करण्यात आला होता. ज्यांनी हे प्रशिक्षण पूर्ण केले अशाच व्यक्तींना या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली होती. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथील भूमिपुत्र सागर कावळे (वय ४७) या धावपटूचा समावेश होता. त्यापे कांस्यपदरक मिळविले आहे. 89 किमीची ही स्पर्धा 10 तास 1 मिनिटात पूर्ण केली आहे. सागर कावळे हे पुणे येथील खाजगी कंपनीत कार्यकारी अभियंता पदावर असून, यापूर्वी त्यांनी टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धा तसेच अहमदाबाद मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होवून विजय मिळवला आहे.

आजच्या धकाधकीच्या जगात फिटनेस खूप महत्त्वाचा आहे. स्व्त:ला फिट ठेवण्यासाठी धावणे हा खूप चांगला व्यायाम आहे. यामुळे ताण कमी होण्यास आणि जीवन शिस्तबद्ध बनण्यास मदत होते. आपल्या आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे आणि धावण्याने मला स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यास मदत केली. 2017 पासून मी 7 पेक्षा जास्त पूर्ण मॅरेथॉन (42.2Km) आणि 25 पेक्षा जास्त हाफ मॅरेथॉन (21.1km) मध्ये भाग घेतला आहे आणि तरीही ते चालू ठेवायचे आहे. तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी नियमित व्यायाम आणि संतुलित आहार अत्यंत आवश्यक आहे, असे मत धावपट्टू कांस्यपद विजेते भूमिपूत्र सागर कावळे यांनी म्हटले आहे.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news