भंडारा: जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनावर दगडफेड; एक गंभीर जखमी

भंडारा: जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनावर दगडफेड; एक गंभीर जखमी

भंडारा: पुढारी वृत्तसेवा : जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनावर केलेल्या दगडफेकीत वाहनातील एकजण गंभीर जखमी झाला. ही घटना मोहाडी तालुक्यातील कांद्री येथे गुरुवारी रात्री १० च्या सुमारास घडली. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध आंधळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तर दोघांना अटक करण्यात आली आहे.

मोहम्मद उस्मान वल्द मोहम्मद सुबान (वय ३७ रा. कामठी, जि. नागपूर) असे गंभीर जखमी वाहकाचे नाव आहे. त्याच्यावर कामठी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, शेख मोहसीन नशीर (वय २७ रा. कामठी) हा चारचाकी वाहनामधून ( एमएच २७ बीएक्स ३४५७) बघेडा येथून जनावरांची वाहतूक करीत होता. दरम्यान त्याचे वाहन कांद्री येथील राईस मिलजवळ येताच शेखर बडवाईक व त्याच्या पाच ते सहा साथीदारांनी त्याच्या वाहनावर दगडफेक करण्यास सुरुवात केली.

या दगडफेकीत वाहनाची काच फुटली. दगडफेकीमुळे वाहन चालक शेख नशीर याला किरकोळ दुखापत झाली. तर एक दगड चालकाच्या बाजुला बसलेल्या मोहम्मद उस्मान वल्द मोहम्मद सुबान याच्या डोक्याला लागल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ कामठी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.  याप्रकरणी आंधळगाव पोलिसांनी शेखर बडवाईकसह सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश पडवार करीत आहेत.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news