Nagpur | महिलेचे हृदय चक्क उजवीकडे, डॉक्टरांनी दिले जीवदान !

भारतातील पहिली, जगातील तिसरी; नागपूरच्या डॉक्टरांनी तपासणी केली असता निदान
woman-heart-on-right-side-doctors-save-life
नागपूर : वृद्ध महिलेवर शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर आणि सपोर्ट स्टाफ.File Photo
Published on
Updated on

नागपूर : घरकाम करत असताना एका महिलेला छातीत दुखायला लागले. श्वास घ्यायला त्रास जाणवल्यानंतर त्यांना नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथील रुग्णालयात नेण्यात आले. अखेर नागपूरला आणले मात्र हृदयाचे ठोके ऐकू येत नसल्याने डॉक्टरांनी आशा सोडली. पण नाडी हाताला लागल्याने विश्वास वाढला. रुग्ण जिवंत असल्याची खात्री पटली. डॉक्टरने तपासणी केली असता या रुग्णाचे हृदय डाव्या बाजूला नव्हे तर उजव्या बाजूला असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले आणि त्यांना धक्काच बसला. हृदय उजव्या बाजूला असल्याचे आणि वयाच्या 70 व्या वर्षांनंतर निदान झालेली ही जगातील तिसरी किंवा चौथी केस असावी, भारतातील ही पहिलीच घटना असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

या महिलेच्या हृदयाची मुख्य रक्तवाहिनी 90 टक्के बंद झाल्यामुळे तज्ज्ञांनी यशस्वी अँजिओप्लास्टी केली. उजव्या बाजूच्या हृदयात स्टेंट टाकून रक्तप्रवाह पूर्ववत झाला आणि रुग्णाला नवजीवन मिळाले. छाया असे या नाव बदललेल्या 70 वर्षीय महिलेचे नाव आहे. सावनेर येथून या महिला रुग्णाला हिंगणा येथील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. इसीजी काढल्यावर हृदयरोग तज्ज्ञ डॉ. हितेंद्र भागवतकर यांना हृदयाची स्थिती डाव्या नव्हे तर उजव्या बाजूला असल्याचे निदर्शनास आले. मात्र, मुख्य रक्तवाहिनी बंद होण्याच्या मार्गावर असल्याने त्यांनी तातडीने निर्णय घेतला. तासभराच्या या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर महिला रुग्णाला नवजीवन मिळाले.

रक्त पातळ करणारी औषधे, वेदनाशामक आणि आवश्यक उपचार देण्यात आले. तथापि, ही शस्त्रक्रिया विचारपूर्वक करावी लागल्याने यासाठी तासभर वेळ लागल्याचे डॉ. भागवतकर यांनी सांगितले.

डेकस्ट्रोकार्डिया : आईच्या पोटात बाळ असताना तयार होते ही अवस्था वैद्यकीय भाषेत या स्थितीला डेकस्ट्रोकार्डिया असे म्हणतात. जन्मता ही अवस्था आईच्या पोटात बाळ असताना तयार होते. साधारणतः 9 ते 18 आठवड्यांच्या कालावधीत भ्रूणातील हृदय,आतड्यांची रचना निश्चित होत असते. त्या टप्प्यात काही जैविक कारणांमुळे किंवा अनुवंशिक घटकांमुळे हृदयाची दिशा बदलते. शरीराच्या उजव्या बाजूस हृदय विकसित होते अशा लोकांची हाडे अत्यंत ठिसूळ असतात आणि त्वचा पातळ असते. ही अवस्था अत्यंत दुर्मीळ असून लाखो लोकांमध्ये एखादा रुग्ण आढळतो. आपल्या देशात असे रुग्ण आतापर्यंत तरी आढळले नसल्याचे डॉ. हितेंद्र भागवतकर यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news