नाथजोगी समाजावर होणारे अत्याचार थांबवा ,नाथजोगी, नाथपंथी,भराडी भटक्या जमाती हा समाज शैक्षणिक सामाजिक व आर्थिकदृष्ट्या खुप मागासलेला आहे. भीक मागणे हा या समाजाचा व्यवसाय आहे. या समाजावर होणारे अन्याय, अत्याचार सरकाने कडक कायदे करुन थांबवावे, तसेच पिडीत कुटूंबाचे पुनर्वसन करुन २५ लाख रुपये आर्थिक मदत द्या,नाथजोगी समाजाला घरकुल योजनेचा लाभ द्यावा, जमीनीचे हक्काचे पट्टे देण्यात यावे, मुलांना शासकीय वसतीगृहाचा लाभ देण्यात यावे, सुशिक्षित मुलांना महिलांना रोजगार देण्यात यावे या व इतर मागण्यासाठी नारायण शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नाथजोगी, नागपंथी भराळी संघर्ष समितीने मोर्चा काढला होता.