

नागपूर : पुढारी वृत्तसेवा
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार१६ डिसेंबरपासून नागपुरमध्ये सुरू होत आहे. आठवडाभराचे कामकाज ठरलेल्या अधिवेशनामध्ये यावेळी तारांकित प्रश्न, लक्षवेधी राहणार नसून, केवळ ठराव राज्यपाल अभिभाषण चर्चा आणि पुरवणी मागण्यावर चर्चा होणार आहे.
नागपूर करारानुसार विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरमध्ये होत असते. या अधिवेशनातुन विदर्भातील प्रश्नांना न्याय मिळावा, अशी आशा असते. गुरूवारी अख्खे विधिमंडळ सचिवालय मुंबईतुन नागपुरात डेरेदाखल झाले. विधिमंडळ सुरक्षा यंत्रणांनीही विधानभवनाचा ताबा घेतला. शुक्रवार १३ डिसेंबरला सचिवालयातील विविध अधिका-यांचीही कार्यालये सज्ज झाली. काही ठिकाणी कर्मचारी साहित्य लावण्यात व्यस्त असल्याचे दिसून आले.