प्रकाश आंबेडकरांनी काय सांगितले मविआतील संघर्षाचे कारण ?

प्रकाश आंबेडकरांनी मविआतील संघर्षाचे सांगितले 'हे' कारण
What did Prakash Ambedkar say about the reason for the conflict in Mahavikas Aghadi?
प्रकाश आंबेडकरांनी काय सांगितले मविआतील संघर्षाचे कारण ?File Photo
Published on
Updated on

नागपूर : पुढारी वृत्तसेवा

महाविकास आघाडीत काँग्रेस ठरवते आहे की 150 जागा पेक्षा कमी जागा घ्यायच्या नाहीत. शरद पवार यांनी ठरवले की 88 खाली यायचे नाही. मग उद्धव ठाकरे सेनेला फक्त 44 जागा सुटतील अशी परिस्थिती आहे. उध्दव ठाकरे यांच्या सेनेला जागा देणे हे परवडणारे नाही. यावरूनच महाविकास आघाडीमध्ये बराच संघर्ष सुरू असल्याचे टीकास्त्र वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी सोडले. काँग्रेसमधला ओबीसी आणि मुस्लिम समूह फार मोठ्या प्रमाणात आमच्याशी संबंध ठेवून आहे अशी धक्कादायक माहिती त्‍यांनी दिली.

आम्ही आदिवासी आणि कुणबी या दोन फॅक्टरसाठी थांबलो. चोपडा येथे मोर्चा निघणार आहे. आपल्या हक्काच्या जागांसाठी आदिवासी समूहात चर्चा सुरू आहे. लवकरच वंचित बहुजन आघाडीची यादी जाहीर होईल असे त्‍यांनी सांगितले.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे याला जाहीर पाठिंबा दिला आहे. ओबीसी संघटना आता शरद पवार यांना मराठ्यांचे नेते शरद पवार असे विशेषण लावत आहेत. मराठा मुद्दा पश्र्चिम महाराष्ट्रातही पोहोचला आहे. विदर्भ होत नाही म्हणून त्याचे खापर काही लोकांनी कुणबी समाजावर फोडले आहे. विदर्भातील कुणबी समाज विदर्भवादी पेक्षा पश्र्चिम महाराष्ट्रवादी होत आहे. हे येणाऱ्या राजकारणाचे संकेत असल्याचे आंबेडकर म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news