वर्धा येथे नोटांच्या तुकड्यांचा ट्रक जळून खाक; घटनास्थळी नागरिकांची गर्दी

Wardha News | पोलीस, प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी दाखल
truck burns in Wardha
बरबटी (जि. वर्धा) येथे नोटांच्या तुकड्यांचा ट्रक जळून खाक झाला. File Photo
Published on
Updated on

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना ठिकठिकाणी पोलिसांच्या तपासणीत मोठ्या प्रमाणावर रोकड पकडली जात आहे. अशातच विविध प्रकारच्या नोटांच्या तुकड्यांनी भरलेला एक ट्रक जळून खाक झाल्याचे कळताच खळबळ माजली. अर्थातच ट्रक भरून नोटा म्हटल्यावर सारेच क्षणभर दचकले. ही घटना बरबटी (जि. वर्धा) येथे आज (दि.१०) सकाळी घडली.

तातडीने पोलीस, प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी पोहोचली. याविषयीची माहिती मिळतात आसपासच्या गावातील लोकांनी या ठिकाणी गर्दी केली. तर्कवितर्क लावले जाऊ लागले.

सोळा चाकांचा ट्रक (युपी 12 सिटी 5327) हैदराबाद येथून उत्तर प्रदेशच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळाली. या ट्रकमध्ये विविध प्रकारच्या नोटांचा तुकड्यांचा स्क्रॅप माल होता. शॉर्टसर्किटने या ट्रकला आग लागून तो जळून खाक झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रिझर्व्ह बँकेने अलीकडेच या स्क्रॅप मालाचा लिलाव केला होता. त्यानुसार, हा माल वाहून नेला जात होता. वर्धा जिल्ह्यातील सिंदी पोलीस यासंदर्भात अधिक तपास करीत आहेत.

truck burns in Wardha
नागपूर: जिल्ह्यात 289 उमेदवार,आज किती बंडखोर माघार घेणार ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news