Vishwas Nangre Patil : "स्व-रक्षणासाठी शस्त्र मागा, मी परवाना देतो!": पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे महिलांना आवाहन

‘आदिशक्ती आत्मसंस्कार’ शस्त्र प्रशिक्षण शिबिरात महिलांना केले मार्गदर्शन
Vishwas Nangre Patil on women safety
नागपूर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील.File Photo.
Published on: 
Updated on: 

Vishwas Nangre Patil on women safety

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : "गुन्हेगारी प्रमाणात राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्यूरोच्या (एनसीआरबी) आकडेवारीनुसार राज्याचा १८ वा नंबर लागत असला, तरी मागील पाच वर्षांत ७,५३५ बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहेत. महिलांना स्वसंरक्षणासाठी एखाद्याचा जीव घेण्याचाही अधिकार नवीन भारतीय न्याय संहिता (बीएनएस) ने दिला आहे, असे स्पष्ट करत महिलेने स्व-रक्षणासाठी शस्त्र परवान्याची मागणी केली, तर तो देण्यास तयार आहे," असे मोठे विधान नागपूर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी केले.

‘आदिशक्ती आत्मसंस्कार’ शस्त्र प्रशिक्षण शिबिरात मार्गदर्शन

शारदेय नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षा शिवानी दाणी यांच्या संकल्पनेतून चॅरवेती फाऊंडेशनतर्फे ‘आदिशक्ती आत्मसंस्कार’ शस्त्र प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात विश्वास नांगरे पाटील यांनी महिलांना मार्गदर्शन केले.

Vishwas Nangre Patil on women safety
Vishwas Nangre Patil | औद्योगिक सुरक्षेला देशाच्या आर्थिक, ऊर्जा सुरक्षेचा आधारस्तंभ बनवा : विश्वास नांगरे पाटील

एकही महिलेने आजपर्यंत शस्त्र परवाना मागितला नाही

यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना विश्वास नांगरे पाटील म्हणाले की, "पोलीस आयुक्त या नात्याने मला शस्त्र परवाने देण्याचा अधिकार आहे. मात्र, एकही महिलेने आजपर्यत स्व-रक्षणासाठी शस्त्र परवान्याची मागणी केलेले नाही."

Vishwas Nangre Patil on women safety
करिअर निवडताना विद्यार्थ्यांनी संधी शोधल्‍या पाहिजेत : विश्वास नांगरे- पाटील

महिला अत्याचार प्रकरणात आठ दिवसांत आरोपपत्र दाखल करणार

गुन्हेगारी प्रमाणात एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार राज्याचा १८ वा नंबर लागत असला, तरी मागील पाच वर्षांत ७,५३५ बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहेत. मुलींना गर्भातच मारण्यापासून लग्नानंतरच्या हिंसाचारापर्यंत असे गुन्हे घडतात. आता बीएनएस कायद्यात स्व-रक्षणासाठी जीव घेण्याचा अधिकार आहे. नागपुरात निर्भया पथकाच्या माध्यमातून महिलांना टार्गेट करणाऱ्या गुन्हेगारांविरोधात आठ दिवसांत दोषारोपपत्र आणि दोन महिन्यांत शिक्षा होईल, अशा उपाययोजनाही करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news