Vishwas Nangare Patil Nagpur Police Commissioner : नागपूर पोलीस आयुक्तपदी विश्वास नांगरे-पाटील; डॉ. रविंद्र सिंघल यांची ACBमध्ये बदली

IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश
Vishwas Nangare Patil Nagpur Police Commissioner : नागपूर पोलीस आयुक्तपदी विश्वास नांगरे-पाटील; डॉ. रविंद्र सिंघल यांची ACBमध्ये बदली
Published on
Updated on

नागपूर : नागपूर शहराच्या पोलीस प्रशासनात मोठा प्रशासकीय बदल करत महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने सोमवारी वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. नागपूरचे विद्यमान पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंघल यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी विश्वास नांगरे-पाटील यांची नागपूर शहराच्या नव्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या आदेशानुसार, सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) अपर पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत असलेले विश्वास नांगरे-पाटील आता नागपूर शहराचे नवे पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. तर विद्यमान पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंघल यांना एसीबीच्या अपर पोलीस महासंचालकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 22न अंतर्गत सक्षम प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर हा आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशानंतर पुढील आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश पोलीस महासंचालकांना देण्यात आले असल्याचे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

विश्वास नांगरे-पाटील हे त्यांच्या धाडसी आणि कर्तव्यदक्ष कार्यशैलीमुळे राज्यभरात विशेष ओळख निर्माण केलेले अधिकारी आहेत. कठोर प्रशासन, गुन्हेगारीविरोधातील प्रभावी कारवाई आणि नागरिकांशी थेट संवाद या गुणांमुळे त्यांची स्वतंत्र ओळख आहे. त्यामुळे त्यांच्या नियुक्तीनंतर नागपूर शहराच्या पोलीस प्रशासनात अधिक गतिमान आणि प्रभावी कार्यपद्धती पाहायला मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दुसरीकडे, डॉ. रविंद्र कुमार सिंघल यांनी नागपूर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांच्या कार्यकाळात अनेक संवेदनशील परिस्थितींमध्ये प्रभावी व्यवस्थापन करण्यात आले. आता ते लाचलुचपत प्रतिबंधक विभागात नवी जबाबदारी सांभाळणार असून त्या ठिकाणीही त्यांच्या अनुभवाचा फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news