Nagpur News | नागपुरात विदर्भवादी शिष्टमंडळास राष्ट्रपतींची भेट नाकारली

जिल्हाधिकारी नागपूर, विभागीय आयुक्त (महसूल) नागपूर, पोलीस आयुक्त आणि , राजभवनामार्फत राष्ट्रपतींची वेळ मिळविण्याचा प्रयत्न
Separate Vidarbha State
Separate Vidarbha StatePudhari
Published on
Updated on

President Murmu Nagpur Visit

नागपूर: देशाच्या महामहीम राष्ट्रपती महोदयांचे पद घटनात्मकदृष्ट्या सर्वोच्च पद आहे. सामान्यांना न्याय मिळत नसल्यास किंवा जनतेची गाऱ्हानी वर्षानुवर्षे निकाली निघत नाही अश्या परिस्थितीत नागरिक, नागरिकांचे समूह, आंदोलनकारी चळवळी आपली सार्वजनिक गाऱ्हानी महामहीम राष्ट्रपतीची वेळ घेऊन मांडू शकतात.

असाच प्रयत्न, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नागपूर मुक्कामी असल्याने विदर्भ निर्मितीचे गाऱ्हाने मांडण्याकरता विदर्भवाद्यांनी विदर्भ राज्य आंदोलन समिती विराआसने केला. मात्र, त्यांना भेटीची वेळ नाकारली गेली आहे. जिल्हाधिकारी नागपूर, विभागीय आयुक्त (महसूल) नागपूर, पोलीस आयुक्त आणि , राजभवनामार्फत वेळ मिळविण्याचा प्रयत्न केला.

Separate Vidarbha State
Nagpur crime news | इंस्टाग्रामवरील प्रेम त्रिकोणातून महाल परिसरात गाड्यांची तोडफोड, तिघांना घेतले ताब्यात

परंतु, विदर्भ राज्य निर्मितीचे प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेली मागणी मांडण्यासाठी महामहीम राष्ट्रपतीचा वेळ न मिळणे किंवा वेळ न देणे ही लोकशाहीत दुर्देवी घटना असल्याचा संताप विराआसच्या वतीने अध्यक्ष व माजी आमदार अॅड. वामनराव चटप आणि सहकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news