Vidharbha Heatwave |उन्हाचा तडाखा : ट्रॅफिक सिग्नल्सवर वाहनांसाठी ग्रीन नेटसह स्प्रिंकलर, वर्धा- नागपूरात सर्वाधिक तापमान

वर्धा सर्वाधिक 46.8 अंश सेल्सियस तर नागपूरात 46.4अंश तापमानाची नोंद
Vidharbha Heatwave
उन्हापासून वाचण्यासाठी अनेक ट्रॅफिक सिग्नर्ल्सवर असे ग्रीन नेट उभा केले आहेत
Published on
Updated on

नागपूर - विदर्भात आज सर्वाधिक तापमान 46.8 अंश सेल्सियस वर्धा येथे त्या खालोखाल नागपूर 46.4अंश सेल्सियस अशी तापमानाची नोंद झाली. 25 मे पासून नवतपा सुरू झालेला असल्याने या काळात तापमान जुने विक्रम मोडणार का, अशी भीती व्यक्त होत आहे. नागपुरात आज सकाळपासून काहीसे ढगाळ वातावरण असताना आणि वादळी पावसाचा इशारा दिलेला असताना सूर्यकिरणांची दुपारची तीव्रता असह्य करणारी होती.

वाहतूक सिग्नलवर ग्रीन नेट, स्प्रिंकलर काहीसा दिलासा देत असले तरी अनेक जागी हिट ऍक्शन प्लॅन फारसा गांभीर्याने पाळला जाताना दिसत नसल्याच्या तक्रारी आहेत. उष्माघाताचे आणि विशेषतः रुग्णालयात दाखल होणारे रुग्ण गेल्या काही दिवसात उपराजधानीत मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यातून अनेकांचे मृत्यूही ओढवले. विदर्भात आजचे तापमान लक्षात घेता अकोला 45 अंश सेल्सिअस, अमरावती 45.2 अंश सेल्सियस, ब्रम्हपुरी 45.2, चंद्रपूर 45.4 अंश सेल्सिअस, गडचिरोली 45 अंश सेल्सिअस, गोंदिया 46.1, यवतमाळ 44.4 तर वाशिम येथे 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news