

नागपूर: धर्मांतर प्रकरणी मुख्य सूत्रधार असलेल्या छागुरबाबाचे नागपूर कनेक्शन उघडकीस आले आहे. लखनऊ व नागपूर दहशतवादविरोधी पथक स्थानिक पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. या छागुरु बाबाला आर्थिक मदत करणाऱ्या ईदुल इस्लाम उर्फ इदू (वय: 42 वर्षे, रा. आसीनगर) याला अटक केली आहे.
शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास करण्यात आलेल्या या कारवाईबाबत अतिशय गुप्तता पाळण्यात आली. उत्तर प्रदेश पोलीस व एटीएस आणि नागपूरचे पाचपावली पोलीस अशी ही संयुक्त कारवाई आहे. इदू हा या छागुर बाबाचा आर्थिक व्यवहार सांभाळत होता. चांगूरबाबा अनेकदा नागपूर पुण्यासह राज्यातील विविध ठिकाणी आला अशी माहिती पुढे येताच लखनऊ एटीएस शोधमोहिम राबवत बाबाला अटक केली.
चौकशी दरम्यान ईदुलचे नाव समोर आल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तो लगेच भूमिगत झाला होता. मध्यंतरी त्याच्या अटकेसाठी लखनऊ एटीएसचे पथक येऊन गेले. मात्र तो हाती लागला नाही. चार पाच दिवस त्यांनी मुक्काम ठोकला व परत गेले. आता तो आपल्या नातेवाईकांना भेटण्यास येत असल्याची व पहाटेच परत जात असल्याचे कळल्याने एटीएस पथकाने पहाटेच त्याच्यावर झडप घातली. पाचपावली पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेण्यात आले न्यायालयातून ट्रांजिट वॉरंटवर ताब्यात घेत अटक करून लखनऊला नेले.
भारत प्रतिकार संघ स्थापना करणाऱ्या छागुर बाबाचे आंतरराज्य कनेक्शन असल्याचे तपासात समोर आले आहे. नागपुरातील ईदुल राष्ट्रीय महासचिव होता. त्याने राज्यात 100 कोटी रुपयापेक्षा मोठा आर्थिक व्यवहार केल्याची तसेच कोट्यवधींचे भूखंड खरेदी केल्याची माहिती पुढे येत आहे.