

Ramtek Taluka Drowning Incident
नागपूर: रामटेक तालुक्यातील चपाळेश्वर देवस्थान येथे तलावाच्या पाण्यात बुडणाऱ्या भाचीला वाचविण्याच्या प्रयत्नात मामा आणि भाची या दोघांचाही बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
हर्षाली विनोद माकडे (वय 13) आणि अजय वामन लोहबरे (वय 33, रा. खातजी, भंडारा) अशी मृतांची नावे आहेत.
ही मुलगी वडिलांसोबत पाण्यात उतरली पण काही वेळातच खोल पाण्यात बुडायला लागली. लागलीच जवळच उभा असलेल्या मामाने तिला वाचविण्यासाठी पाण्यात उडी मारली. मात्र, तिला वाचविण्याच्या प्रयत्नात दोघेही खोल पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले आणि दोघांचा गुदमरून मृत्यू झाला. डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांना मृत घोषित केले.