

नागपूर -प्रत्येकांच्या मनात काय आणि आपल्याला कुठे जायचे हे आपल्याच मनाला माहीत असते. दिल्लीत पत्रकार परिषदेत मविआची वज्रमूठ असल्याचे सांगण्यात आले मात्र ती किती दिवस टिकणार ते पाहू या शब्दात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उबाठा गटाला आव्हान दिले आहे. माझ्याकडे 15 फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आभार दौरा आहे. त्यावेळी मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होतील असा दावा सामंत यांनी केला.बीएमसीमध्ये देखिल महायुतीचीच सत्ता येणार हे स्पष्ट आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मुंबईचा कायापालट करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आता देवेंद्रजी,अजित दादा करताहेत. या तिघांच्या संयुक्त प्रचारातून महायुतीचा भगवा फडकणारच आहे यावर भर दिला.
मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पूर्ण मुलाखत बघितली. त्यांनी अनेक खुलासे केलेत. कसे खोटे बोलून एखाद्याला बदनाम केले जाते हे देवेंद्रजींनी कालच्या मुलाखतीत स्पष्ट केले. पुढील 25 वर्ष महाविकास आघाडीचे भवितव्य अंधारमय राहील असे भाकीत केले. दरम्यान, संजय राऊत काहीही बोलतात. पराभव झाल्यावर केजरीवाल यांची मुलाखत बघितली तर या सगळ्यांची उत्तरे त्यांनी दिली. लोकशाहीचा सन्मान केला पाहिजे स्वतः सांगितले, पराभव कशामुळे झाला त्याचे आत्मचिंतन करण्याचेही त्यांनी सांगितले. मुळात ज्यांच्या पक्षाचा पराभव झाला ते लोकशाहीचा सन्मान आणि बाकीचे लोकशाहीचा अनादर करत आहेत असा टोला लगावला.
विरोधकांनी काय करावे हा त्यांचा अधिकार आहे. परंतु धनंजय मुंडे यांच्या बाबतीत सर्वांची स्पष्ट भूमिका आहे. सध्या न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून काही लोकांना अटक देखील झाली आहे. चौकशीतून जे निष्पन्न होईल यातून शिवसेनेची भूमिका ही संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फासावर चढवावे हीच आहे. ठोसनिष्पन्न काही होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागणे हे योग्य नाही अशी भूमिका बोलून दाखविली.