Nagpur Accident | मित्राच्या वाढदिवसासाठी निघाले; भरधाव कार ट्रकवर आदळली, २ तरुणांचा मृत्यू; चालक जखमी

कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पावनगाव परिसरात भीषण अपघात
Accident News
Accident News file photo
Published on
Updated on

Pawangaon Car Accident Two Youth Dead

नागपूर : मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी कारमधून निघालेल्या तीन अल्पवयीन मित्रांवर काळाने घाला घातला. भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर पाठीमागून जोरदार आदळली. या भीषण अपघातात कारमधील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर कारचालक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी (दि.१२) पहाटेच्या सुमारास कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पावनगाव परिसरात घडली.

या अपघातात भौमिक अमोल लारोकर (वय १६, रा. संचेती कॉलेज परिसर, वर्धा रोड) आणि सागर संजय मेलवाणी (वय १७, रा. पारडी) यांचा मृत्यू झाला. तर कारचालक मिहीर आनंद बेहार (वय १७, रा. सुभाननगर) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर तारांगण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Accident News
Nagpur News: नागपूरमध्ये माजी आमदाराच्या भाडेकरूचा जीवन संपवण्याचा प्रयत्न; पत्नी आणि मुलामुळे वाचला जीव!

मिळालेल्या माहितीनुसार, मिहीर बेहार याच्या वडिलांच्या मालकीची इलेक्ट्रिक टाटा कार (क्रमांक एमएच ४९ सीएस ०४२७) घेऊन मिहीर, भौमिक आणि सागर हे तिघे मित्र बुधवारी पहाटे मित्र जय याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी निघाले होते. मित्र जयला येण्यासाठी काही वेळ लागणार असल्याने हे तिघे कारमधून परिसरात फेरफटका मारत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मिहीर हा कार चालवत होता, तर भौमिक आणि सागर हे अनुक्रमे पुढील आणि मागील सीटवर बसले होते. पहाटे साडेपाचच्या सुमारास पावनगाव ते भरतवाडा वाय-पॉईंटदरम्यान कार भरधाव वेगाने जात असताना अचानक मिहीरचे वाहनावरील नियंत्रण सुटले.

Accident News
Nagpur Cyber Scam: बनावट बँक खाती, २३६ एटीएम, ८५ चेकबुक आणि ४५ सिमकार्ड्स...; नागपुरात तब्बल ९० कोटींचा सायबर घोटाळा

याचदरम्यान रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रक क्रमांक सीजी ०४ एमसी २९८१ वर कार पाठीमागून जोरदार आदळली. धडक एवढी भीषण होती की कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. अपघातात कारमधील भौमिक लारोकर आणि सागर मेलवाणी यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी मिहीरला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कळमना पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. मित्राच्या वाढदिवसाचा आनंद साजरा करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या तीन मित्रांपैकी दोघांचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news