

नागपूर : शुक्रवारी नागपुरात सापडलेल्या दोन घुबडांना जीवनदान देण्यात आले. वाइल्डलाइफ वेलफेयर सोसायटीचे सदस्य अभिषेक सवाने यांना व्हीएमव्ही कॉलेज वर्धमान नगर कॉलेजला कार्यरत असलेल्या आरती सैनीज यांचा फ़ोन आला.
दोन घुबडं आमच्या कॉलेजच्या परिसरामधे दिसत आहेत मात्र ते एकाच जागेवर बसून आहेत. त्यांना हवेत उडता येत नव्हते. याची सूचना मिळताच संस्थेचे नीतीश भांदक्कर, दीपक शर्मा, अंकित खलोडे, प्रवीण तुले हे घटनास्थळी पोहोचले. त्त्याठिकाणी दोन घुबडं बसली होती मात्र ती थोडी अवस्थ दिसत होतीत. त्याना सुखरूपपणे पक़डून आवश्यक उपचारासाठी सेमिनरी हिल स्थित ट्रांजिस्ट ट्रीटमेंट सेंटरला नेण्यात आले.