नागपूर रेल्वे स्थानकावर मनोरूग्णाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू

Nagpur News | रुग्णाची मनोरुग्णालयात रवानगी
Nagpur railway station security
नागपूर रेल्वे स्थानकावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. File Photo
Published on
Updated on

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : नागपुरातील मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर सोमवारी पहाटेच्या सुमारास मनोरूग्णाने केलेल्या हल्ल्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले. आरोपी मनोरुग्णाची आज (दि.९) नागपुरातील प्रादेशिक मनोरुग्णालयात रवानगी करण्यात आली. जयराम केवट या मनोरुग्णावर मानसोपचार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचार केले जाणार आहेत.

पंधरा दिवसानंतर त्याच्या नातेवाईकांशी संपर्क करून त्याची वैद्यकीय पार्श्वभूमी तपासणी केली जाईल. त्याची प्रकृती सामान्य झाल्यानंतर मेंटल रिव्ह्यू बोर्डासमोर त्याची फेरतपासणी केली जाईल. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. सोमवारी पहाटेच्या सुमारास जयरामने लाकडी स्लीपरच्या साह्याने प्लॅटफॉर्म क्रमांक सातवर असलेल्या प्रवाशांवर हल्ला चढवला होता. यावेळी चार जण गंभीर जखमी झाले. दोघांचा मृत्यू झाला. तर दोघे रुग्णालयात दाखल झाले आहेत. तामिळनाडू येथील गणेशकुमार यांचा रेल्वे स्थानकावरच मृत्यू झाला. तर धामणगाव येथील संजय पिल्लारे यांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. याशिवाय नागपूरचे भगवान जारखेल व ग्वाल्हेरचे बळवंत जाटव यांचा गंभीर जखमींमध्ये समावेश आहे.

Nagpur railway station security
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सोलापूर-नागपूर विशेष रेल्वे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news