नागपूर : पतंगबाजीत दोघांचा गेला जीव, अनेकजण जखमी

नायलॉन मांजा बंदी फुसका बार
नागपूर : पतंगबाजीत दोघांचा गेला जीव, अनेकजण जखमी
File photo
Published on
Updated on

नागपूर : महापालिका आणि पोलीस प्रशासन एकीकडे नायलॉन मांजा विरोधात ठीक ठिकाणी कारवाईचा दावा करीत असले तरी ही कारवाई फुसका बार असल्याचे दिसले. सुमारे अठरा लाख रुपयांचा नायलॉन मांजा पोलिसांनी बुलडोजरखाली तुडवीत नष्ट केला असला तरी उपराजधानीत पतंग उत्सवाच्या धामधुमीत दोन तरुणांचा हकनाक जीव गेला. एका महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह अनेक जण जखमी झाले. 20 पेक्षा अधिक जखमींवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व इतर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.

हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चंदन शेष नगर येथे राहणारा रितेश अशोक गंधश्रीवार (वय 27) हा मंगळवारी पतंग पकडण्यासाठी धावत असताना त्याच्या छातीत दुखायला लागल्याने लगेच तो औषध घेण्यासाठी दुकानात गेला मात्र मेडिकल स्टोरसमोरच तो खाली पडला. मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असते डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. पोलिसांच्या मते रितेश पतंग आणायला जात असताना त्याच्या छातीत दुखायला लागले. मेडिकलमध्ये हृदयविकाराने त्याचा मृत्यू झाला. दुसऱ्या एका घटनेत गिटटीखदान परिसरात राहणाऱ्या सोहेल खान सलीम खान (वय 20) हा युवक पतंग उडविण्याचा आणि मांजा गोळा करण्याचे नादात पाचव्या मजल्याचे टेरेसवरून खाली कोसळला. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

सीताबर्डी पोलीस ठाण्यात कार्यरत शितल खेडकर या दुचाकीने पोलीस ठाण्यात येत असताना एमआयडीसी पोलीस ठाण्याचे हद्दीत नायलॉन मांजामुळे त्यांच्या नाकाला गंभीर दुखापत झाली. लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. रोशनी अजय बागडे या मानकापूर उड्डाण पुलावरून जात असताना चेहऱ्यावर जखम झाली. विशेष म्हणजे त्यांनी हेल्मेट आणि गळ्याला दुपट्टा लपेटला असताना अपघात घडला. इतर जखमींमध्ये लता घाटोळे, अतुल वर्मा,सुमित नागपुरे, रंगा ठाकूर, रोशनी पकीड्डे, अशोक चौरागडे, आयुर सोनवणे, प्रशांत राय आदींचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news