Nagpur : सव्वातीन लाखाच्या एमडीसह दोघांना अटक

MD drug trafficking: एकूण ३ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
MD drug trafficking case
Nagpur : सव्वातीन लाखाच्या एमडीसह दोघांना अटकfile photo
Published on
Updated on

नागपूर : उपराजधानीत छुप्या मार्गाने एमडी पावडर (ड्रग्ज) विकणाऱ्या दोन विक्रेत्यांना पोलिसांनी अटक केली. आरोपींच्या ताब्यातून एमडी पावडरसह एकूण ३ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ३ तसेच गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने स्वत्रंतत्ररित्या ही कारवाई केली. अभिषेक उर्फ दादु मोतीलाल राजणे (२७, रा. आंबेडकर चौक, नंदनवन झोपडपट्टी) आणि सौरभ प्रमोद बोरकर (२४, रा. गुलाबबाबा झोपडपट्टी, इमामवाडा) अशी आरोपींची नावे आहेत.

गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहितीवरून मंगळवार, ११ फेब्रुवारी रोजी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकीवरून जात असलेल्याअभिषेक राजणे याला थांबविले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ ३० ग्रॅम एमडी पावडर सापडले. कारवाईत पोलिसांनी एमडी पावडरसह एक मोबाईल आणि दुचाकी असा एकूण २ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

दुसरी कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाने ईमामवाडा हद्दीत केली. मध्यरात्री २.३० वाजताच्या सुमारास आरोपी सौरभ बोरकर याला थांबविले. अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यात ५ ग्रॅम एमडी पावडर सापडले. दोन्ही आरोपी ड्रग्जची विक्री करत असल्याची त्यांनी कबुली दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news