

Leopard conservation project
नागपूर: भविष्यकाळात ताडोबा व पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या धर्तीवर बिबट्यांसाठी स्वतंत्र प्रकल्प उभारले जातील, याबाबतचे नियोजन करण्यास सांगितले आहे. बिबट्या सफारीचा प्रलंबित मुद्दा आता मार्गी लागेल, अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली. वनविभागाच्या समस्या संदर्भात आयोजित केलेल्या बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.
बिबट्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारकडून काही मादी बिबट्यांवर प्रक्रिया करण्याची परवानगी दिली आहे . 3 महिन्यांच्या आत हा प्रयोग यशस्वी झाला. तर पुढील प्रक्रिया राबवली जाणार आहे. बिबट्यांना सुरक्षित अधिवास मिळण्यासाठी व्याघ्र प्रकल्पाच्या धर्तीवर विशेष प्रकल्प करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नाशिकमधील तपोवन येथील अनावश्यक वृक्ष तोडू नयेत, याविषयी आम्ही तिथल्या संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करू, झाडांची कमीत कमी कत्तल करा व झाडे स्थलांतरित कशी करता येतील, याचे नियोजन करण्याच्या सुचना दिल्या आहेत. दरम्यान ,खा. निलेश लंके यांची टीका संदर्भात बोलताना गुजरात व महाराष्ट्राची सीमा निश्चित नाही. बिबट्याला कोण थांबवणार ? असे उत्तर त्यांनी दिले.