Nagpur Fraud | मोठ्या भिशीच्या आमिषाने तिघांना १६.५५ लाखांचा गंडा; कपिलनगर पोलिसांत गुन्हा

नफा तर सोडाच, मुदत संपल्यानंतरही मूळ रक्कम परत नाही
financial scam |
financial scam |Pudhari Photo
Published on
Updated on

Nagpur Bhishi Fraud

नागपूर : मोठी भिशी चालवून आकर्षक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत तिघांकडून तब्बल १६ लाख ५५ हजार ८०० रुपये उकळून फसवणूक केल्याचा प्रकार उत्तर नागपुरातील नारी रोड परिसरात समोर आला आहे. भिशीची मुदत पूर्ण झाल्यानंतरही आरोपीने नफा अथवा जमा केलेली मूळ रक्कम परत न केल्याने अखेर तिघांनी कपिलनगर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानेवाडा येथील किरण नारायण देवगडे (३२) यांची एका मित्रामार्फत नारी रोड परिसरातील गुरुप्रीतसिंह मनजीतसिंह वाडे याच्याशी ओळख झाली. आरोपीने आपण मोठी भिशी चालवत असल्याचे सांगत किरण देवगडे आणि त्यांच्या मित्रांना पैसे गुंतविण्यास प्रवृत्त केले.

financial scam |
Nagpur Fraud | सावकारीच्या नावाखाली निवृत्त शिक्षकाची फसवणूक; ‘बंटी-बबली’ जोडीविरुद्ध बेलतरोडी पोलिसांत गुन्हा

त्यानंतर नारी रोडवरील ‘मोगा मोटर्स’ कार्यालयात १३ जुलै २०२४ ते १६ डिसेंबर २०२५ या कालावधीत तिघांनी वेगवेगळ्या रकमा जमा केल्या. तक्रारीनुसार, किरण देवगडे यांच्याकडून ५ लाख ५६ हजार रुपये, नीरज यांच्याकडून ८ लाख ४९ हजार ८०० रुपये, तर प्रशांत गावंडे यांच्याकडून २ लाख ५० हजार रुपये घेण्यात आले. अशाप्रकारे तिघांकडून एकूण १६ लाख ५५ हजार ८०० रुपये जमा करण्यात आले.

मुदत संपली, मात्र पैसे परत नाही

भिशीची ठरलेली मुदत पूर्ण झाल्यानंतर तिघांनी आरोपीकडे जमा केलेली रक्कम तसेच ठरल्याप्रमाणे नफ्याची मागणी केली. मात्र, आरोपीकडून पैसे देण्यास टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप आहे. वारंवार मागणी करूनही नफा तर मिळालाच नाही, शिवाय जमा केलेली मूळ रक्कमही परत करण्यात आली नाही.

financial scam |
Dahi Handi Nagpur | डीजेला फाटा: भजनाच्या तालावर रंगला दहीहंडीचा थरार; नरेंद्रनगरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रतीकात्मक दहीहंडी फोडून उत्सवाला सुरुवात

अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिघांनी कपिलनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुरुप्रीतसिंह वाडे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, आरोपीने आणखी काही नागरिकांकडून अशाच पद्धतीने पैसे उकळले आहेत का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. तसेच भिशीशी संबंधित कागदपत्रे, आर्थिक व्यवहार आणि जमा झालेल्या रकमेच्या व्यवहारांचीही चौकशी केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news