'त्या' वाघिणीला घातलेला घेराव पडला महागात, निलंबन, दंड

चार जिप्सी चालक व पर्यटकांच्या मार्गदर्शकांना निलंबित केले
The case of the siege of 'that' tigress; Gypsy driver, guard suspended, fined
'त्या' वाघिणीला घातलेला घेराव पडला महागात, निलंबन, दंडFile Photo
Published on
Updated on

नागपूर : पुढारी वृत्तसेवा

नागपूर जिल्ह्यातील उमरेड करांडला अभयारण्यात एक वाघीण आणि तिच्या पाच शावकांना पर्यटकांच्या जिप्सींनी घेराव घातलेला होता. याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. हे प्रकरण चांगलेच अंगलट आले आहे. या प्रकरणी चार जिप्सी चालक व पर्यटकांचे चार मार्गदर्शक गार्ड यांना निलंबित करण्यात आले आहे.

प्रत्येक जिप्सी चालकाला अडीच हजार रुपये तर मार्गदर्शक यांना प्रत्येकी 450 रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. गेले काही दिवस उमरेड करांडला अभयारण्यातील गोठणगाव प्रवेशद्वार परिसरात ही वाघीण आणि तिचे शावक पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. यावेळी देखील तिचे दर्शन झाल्याने छायाचित्र काढण्यासाठी पर्यटकांमध्ये चढाओढ सुरू होती. यातूनच वाघिणीला या वाहनांनी गराडा घातला होता. या चालकांवर आठवडाभर कालावधीसाठी हे निलंबन असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news