कोट्यवधींचा शिक्षक घोटाळा : विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना अटक

नरड यांच्यारील कारवाईने शिक्षण विभागात खळबळ
Divisional Education Deputy Director Ulhas Narad arrested
कोट्यवधींचा शिक्षक घोटाळा : विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना अटकFile photos
Published on
Updated on

नागपूर : पुढारी वृत्तसेवा

शिक्षण विभागात बनावट शालार्थ आयडी प्रकरण मागील अनेक वर्षांपासून गाजत असताना मंत्रालय स्तरावर नेमलेल्या समितीच्या तपासात नागपुरातच बोगस शालार्थ आयडी तयार करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. नागपूर जिल्ह्यातील बनावट शिक्षक नियुक्ती प्रकरणात नागपूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. बोगस कागदपत्रांच्या आधारावर मुख्याध्यापक पदास मंजुरी दिल्या संदर्भात शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना उशिरा रात्री गडचिरोलीतून अटक करण्यात आली.

या प्रकरणात भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील मुख्याध्यापक पराग पुडके यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. संशयित आरोपी मुख्याध्यापक पराग पुडके याला शिक्षक पदाचा अनुभव नाही. शिक्षक म्हणून कोठेही काम केले नसताना थेट मुख्याध्यापक बनविण्यात आले.

यासाठी नागपुरातील एस के बी उच्च प्राथमिक माध्यमिक विद्या मंदिर यादवनगर या शाळेचे बनावट शिक्षक म्हणून कागदपत्र देखील तयार केले. बनावट कागदपत्र तयार करून त्या आधारावर उपसंचालक उल्हासनगर यांनी आर्थिक व्यवहार करून नानाजी फडके विद्यालय देवताडा तालुका लाखनी जिल्हा भंडारा येथे मुख्याध्यापकपदी मंजुरी दिली. नुकतेच मंत्रालयीन स्तरावर समितीच्या अहवालानंतर बनावट शिक्षक नियुक्त प्रकरणात यापूर्वी वेतन पथक आणि भविष्य निर्वाह निधी अधीक्षक निलेश वाघमारे यांना निलंबित करण्यात आले आहे हे विशेष.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news