

Supriya Sule Political Appeal
नागपूर : महायुतीने काय करायचे हा त्यांचा विषय आहे. तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. आम्ही काय करणार तो आमचा अधिकार आहे. पुढच्या काळात त्या सगळ्या गोष्टी स्पष्टपणे दिसून येतील. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने 18 वर्षे राज्य केले. स्थानिक निवडणुका सगळे इलेक्शन वेगवेगळ्या लढलो. मागच्या वर्षी सेना आणि भाजप वेगवेगळे लढले होते. शेवटी या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात. अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्वबळाचे संकेत दिले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात व्यक्त केलेल्या राज्यात गरजेनुसार स्वबळ या भूमिकेवर त्या बोलत होत्या. एकंदरीत विदर्भात महाविकास आघाडीतही यामुळे चिंता वाढणारी आहे. दोन दिवसांपूर्वी काँग्रेसने ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून नागपुरात शक्ती प्रदर्शन केले. दुसरीकडे उपमुख्यमंत्रीअजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मेळावे जोरात आहेत.
दरम्यान,महायुतीतील रोजच्या प्रवेशाबद्दल छेडले असता, भारतीय जनता पार्टीमध्ये आज ओरिजनल कोणी राहिलेला नाही. तुम्ही संसदेत एक नजर टाका व्हिजिटर गॅलरीमध्ये. भारतीय जनता पक्षाचे काँग्रेसीकरण झाले आहे, भाजपच्या अनेक मोठ्या नेत्यांना अटलजी असो सुषमा स्वराज यांना मी जवळून पाहिले.सुषमाताई माझ्या गुरुवर्य आहेत. आम्ही जेव्हा पार्लमेंट मध्ये गेलो सुषमाताई यांच्या भाषणावरून आम्ही शिकलो. आज प्रचंड वेगळं वातावरण आहे. सुसंस्कृत पक्ष होता, तो आता राहिलेला नाही.
राज्यात शेतकरी कर्ज वसुली नको, ही माणुसकीची वेळ आहे.आम्हाला त्यात राजकारण करायचं नाही. ही राजकारण करण्याची वेळ नाही.आपण सगळ्यांनी त्यांच्या मदतीसाठी काम केले पाहिजे. ते मायबाप सरकारला सांगा ही वसुलीची वेळच नाही असेही त्यांनी नागपूर दौऱ्यावर असताना ठणकावले.
मुळात कुणावर आरोप करायचे असेल तर चॅनलवर करायचे नाही? संविधानावर देश चालतो. कोणाच्या मन मर्जीने चालत नाही असे गोपीचंद पडळकर यांच्या आरोपांवर बोलताना स्पष्ट केले. ऑनलाईन पण कंप्लेंट करता येतात असे सांगितले.