Nagpur News : स्थानिक स्वराज्य शाळेतील विद्यार्थी मोफत गणवेशापासून राहणार वंचित ?

CBSE 10th Result 2024
CBSE 10th Result 2024
Published on
Updated on

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : विदर्भातील शाळा 1 जुलैपासून तर उर्वरित महाराष्ट्रातील शाळा शनिवार (दि.15) सुरु होत आहेत. अद्याप कोणत्याही जिल्ह्यातील शाळेतील शिलाईचे काम करणाऱ्या संस्थेच्या कारागिरांनी लाभार्थी विद्यार्थ्यांची मापे घेतलेली नाहीत. अशा परिस्थितीत शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना योग्य मापाचे नियमित गणवेश कसे मिळतील..? असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थांना शालेय गणवेशापासुन वंचित राहणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना योग्य मापाचा गणवेश न मिळाल्यास पालकांच्या रोषाला स्थानिक शिक्षकांना सामोरे जावे लागणार आहे.

समग्र शिक्षा अभियान अंतर्गत जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगर पालिकांच्या शाळेतील इयत्ता 1 ली ते 8 वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी गणवेशाचे दोन संच पुरविण्यासाठी प्रती गणवेश 300 रुपयांप्रमाणे अनुदान शाळा व्यवस्थापन समितीकडे उपलब्ध करून दिले जात होते. त्यानुसार दरवर्षी नवीन सत्रात शाळा सुरु होण्याच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश वितरित केले जायचे. सदर योजनेचे कार्यान्वयन व्यवस्थित सुरु असताना यावर्षी शासनाने गणवेश योजनेच्या कार्यान्वयनात विनाकारण बदल केला आहे.

गणवेश योजनेच्या संबंधाने कार्यान्वयनात येणाऱ्या अडचणी समजून घेऊन आवश्यक कार्यवाही करण्यासह सर्व विद्यार्थ्यांना योग्य मापाचे गणवेश शाळेच्या पहिल्या दिवशी वितरित होण्याची कार्यवाही करावी. यासोबतच स्काऊट गाईडचे गणवेश सुद्धा नियमित गणवेशाप्रमाणे शिलाई करूनच शाळांना मिळावेत, अशी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे विजय कोंबे,राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर, शिक्षक नेते उदय शिंदे, राज्य सल्लागार विजयकुमार पंडित, राज्य कार्याध्यक्ष सयाजी पाटील, राज्य कोषाध्यक्ष नंदकुमार होळकर, राज्य संघटक राजेंद्र खेडकर, पंडित नागरगोजे,महिला आघाडी प्रमुख वर्षाताई कैनवडे,नपा-मनपा आघाडी प्रमुख सुधाकर सावंत,जुनी पेन्शन आघाडी प्रमुख प्रफुल्ल पुंडकर,ऊर्दू आघाडी प्रमुख सैय्यद शफीक आदींनी केली आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news