

नागपूर : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून रिक्त असलेली ग्राम महसूल अधिकार्यांची म्हणजेच तलाठ्यांची 1700 पदे भरली जाणार असून, त्यासाठी शासनाच्या वतीने प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली आहे. यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्या उमेदवारांना डिसेंबरअखेरीस आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, 2023 सालच्या ग्राममहसूल अधिकार्यांच्या पदभरतीच्या परीक्षा आयोजनातील गैरप्रकार आणि नियुक्तीवेळीही पेसा क्षेत्रातील पदांची भरतीच्या उमेदवारांवरून राज्यातील 13 जिल्ह्यांत समस्या निर्माण झाली होती.
मात्र, न्यायालयीन निर्णयाच्या प्रतीक्षेत असलेल्या शासनाने पेसा क्षेत्रातील उमेदवारांना 11 महिन्यांसाठीचे नियुक्तीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे निर्णयानुसार या उमेदवारांची पुढील नियुक्तीबाबत निर्णय होईल.