MNREGA | राज्य सरकार 'मनरेगा' योजनेत काम करणाऱ्यांसाठी कल्याणकारी योजना सुरु करणार

अधिकाधिक कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे रोहयो सचिव गणेश पाटील यांनी सांगितले
Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Act, 2005
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (File Photo)
Published on
Updated on

State Policy for MNREGA Workers

नागपूर: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनामध्ये (मनरेगा) मजूर हा महत्वाचा घटक आहे. जे मजूर वर्षानुवर्षे मनरेगा योजनेत काम करित आहेत त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना तयार करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन असून त्यांना अधिकाधिक कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे सुतोवाच रोहयो सचिव गणेश पाटील यांनी केले.

मनरेगा, आयुक्तालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. या बैठकीस मनरेगा आयुक्त डॉ. भरत बास्टेवाड, उपायुक्त (कृषी) सुबोध मोहरील, सहाय्यक आयुक्त श्रीमती सुस्मिता शिंदे व आयुक्तालयातील सर्व संबंधित शाखेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Act, 2005
Nagpur Jail Prisoner escaped | नागपूर मध्यवर्ती कारागृहातील बंदिवान फरार

मनरेगाच्या कामांमध्ये अधिक अचूकता यावी, यासाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर झाला पाहिजे. "मनरेगाच्या कामांमध्ये पारदर्शकता व गती यावी, यासाठी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने एक मजबूत सनियंत्रण प्रणाली मनरेगा योजनेत काम करित आहेत त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना विकसित करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.

मजुरांना रोजगारासोबतच कौशल्य विकासप्रणीत प्रशिक्षण देऊन त्यांच्यात नवीन कौशल्ये निर्माण केली पाहिजेत. यातून त्यांच्या जीवनात दीर्घकालीन व स्थिरता येईल. याचबरोबर ते उपजीविकेसाठी सक्षम होतील, असेही त्यांनी अधोरेखित केले. या प्रशिक्षणामुळे मजुरांचे आर्थिक सक्षमीकरण साधता येईल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला. मजुरांना वेळेवर काम व वेतन मिळावे, यासाठी यंत्रणेत कोणते बदल आवश्यक आहेत, याचा अभ्यास करून उपाययोजना राबवाव्यात, अशी सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केली.

Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Act, 2005
Nagpur Drown News | नागपूर : जिल्ह्यातील खाणपट्ट्यांची होणार तपासणी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news