

Online Admission Registration on 11th Admission 2025
नागपूर : दहावी शालांत परीक्षा निकालानंतर आता विद्यार्थी आणि पालकांचे अकरावी प्रवेशाचे टेन्शन वाढले आहे. सलग दोन दिवस तांत्रिक अडचणीमुळे विलंब झाला. अकरावी प्रवेशाची प्रक्रिया अखेर आज सोमवारपासून सुरू होत आहे. सकाळी 11 पासून अर्ज नोंदणी व पसंतीक्रम भरण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. बुधवार आणि गुरुवार असे दोन दिवस संकेतस्थळावर तांत्रिक अडचणींचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागला.
यंदा राज्यभर अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबवण्याचा निर्णय शिक्षण संचालनालयाने घेतला आहे. आधीच्या नियोजनानुसार 21 ते 28 मे दरम्यान विद्यार्थ्यांना नोंदणीसाठी मुदत देण्यात आली. आता ही संपूर्ण प्रक्रियाच पाच दिवस पुढे ढकलल्याने वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. आता 26 मे ते 3 जून विद्यार्थी नोंदणी अर्ज भरणे आणि कनिष्ठ महाविद्यालय प्राधान्यक्रम देणे 5 जूनला तात्पुरती गुणवत्ता यादी, सहा ते सात जून हरकती व सूचना नोंदणी, आठ जूनला अंतिम गुणवत्ता यादी लागणार आहे.
दहा जूनला पहिल्या फेरीची यादी, अकरा ते अठरा जून पहिल्या फेरीतील प्रवेशाची मुदत असून 20 जून रोजी रिक्त जागांची माहिती असे वेळापत्रक ठरविण्यात आले आहे. विदर्भातील जिल्हानिहाय जागाचार विचार करता नागपूर जिल्हा 97 हजार 115, बुलढाणा 45 हजार 390, अकोला 37 हजार 15, अमरावती ४०९४० ,भंडारा वीस हजार 940 ,चंद्रपूर 37180, गडचिरोली 14 920, गोंदिया 24 140 ,वर्धा 22 890, वाशिम 23 हजार 400 तर यवतमाळ येथे 39 हजार 730 जागा आहेत. दुसरीकडे राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा 24 जूनपासून घेतली जाणार आहे. दहावीची परीक्षा आठ जुलै पर्यंत आणि बारावीची परीक्षा 16 जुलै पर्यंत चालणार आहे.