जय भवानी, जय शिवाजी..!; गांधीगेट परिसर हजारो शिवभक्तांनी गजबजला

Shiv Jayanti 2025 | उपराजधानी नागपुरात शिवजयंतीचा जल्लोष
Shiv Jayanti 2025
उपराजधानी नागपुरात शिवजयंतीचा जल्लोष Pudhari Photo
Published on
Updated on

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा सोहळा आज (दि.१९) सकाळपासून उपराजधानी नागपुरात जल्लोषात सुरू आहे. महाल गांधी गेट परिसर हजारो शिवभक्तांनी फुलला आहे. सर्वपक्षीयांनी आज छत्रपती शिवरायांना अभिवादन करीत मानाचा मुजरा केला. 'जय भवानी जय शिवाजी'.. च्या जयघोषात मानवंदना दिली. (Shiv Jayanti 2025)

नव्या पिढीत, इंग्रजी शाळा शिकणाऱ्या मुलांना देखील बालपणापासून छत्रपती शिवरायांची प्रेरणा मिळावी. या जय भारत पदयात्रेचा उद्देश असून राजे रघुजी भोसले यांची ही भूमी प्रेरणादायी आहे. विकसित भारताचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर विकसित महाराष्ट्राचे स्वप्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बघितले आहे. महत्प्रयासाने महाराज्याची वाघनखं भारतात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ती नागपुरातील मध्यवर्ती संग्रहालयात आणली. नव्या पिढीत राष्टभक्ती, राष्ट्रसेवा महत्वाची आहे.

मनपाच्या पुढाकाराचे कौतुक पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. मनपा व जिल्हा प्रशासनाच्या वतीने काढण्यात आलेल्या पदयात्रेच्या समारोप निमित्ताने ते बोलत होते. गांधीगेट परिसरात हजारो मुले, नागरिक, स्वयंसेवी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. सकाळी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला दुग्धभिषेक करण्यात आला. सक्करदरा चौक येथील राजे रघुजी भोसले यांच्या प्रतिमेपासून ही जय छत्रपती जय भारत पदयात्रा निघाली. रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी स्वागतासाठी होती.

छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी घोड्यावर स्वार होत लक्ष वेधले. यावेळी ढोलताशांच्या गजरात विविध लेझीम पथकांनी प्रात्यक्षिक सादर केले. राजा शिवछत्रपती प्रतिष्ठान तर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा यावेळी संयोजक मिलिंद येवले यांच्या पुढाकाराने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आमदार आशिष देशमुख, प्रवीण दटके, मोहन मते, माजी आमदार दीनानाथ पडोळे, आयुक्त अभिजित चौधरी, पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर आदी उपस्थित होते.

Shiv Jayanti 2025
नागपूर: ४ महिन्यांपासून संगणक परिचालक मानधनाविना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news