

नागपूर : अनिल देशमुख लोकसभा निवडणुकीत वर्धा मतदार संघात तुतारी वाजविल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आजपासून (दि.७) दोन दिवस विदर्भ दौऱ्यावर येत आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी सभा घेणार असल्याची माहिती माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
आज सकाळी शरद पवार हे नागपूर येथे येतील. यानंतर सकाळी ११ वाजता सात वचन लॉन पूर्व नागपूर येथे दुनेश्वर पेठे यांच्यासाठी प्रचार सभा घेतील. यानंतर तिरोडा येथे दुपारी २:३० वाजता तेथे सभा घेणार घेतील. तेथुन ते हेलीकॉप्टरनेच काटोल येथे जावून सायं. ५ वाजता सलील अनिल देशमुख यांच्यासाठी सभा घेतील. परत नागपूर येथे येवून मुक्काम करतील. शुक्रवारी (दि.८) सकाळी ११ वाजता हिंगणघाट व दुपारी ३ वाजता जिंतुर तसेच सायं. ७ वाजता वसमत येथे सभा होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.