

Social Workers Sudhatai Gadkari Death
नागपूर : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुधाताई गडकरी यांचे मंगळवारी (दि.२२) रात्री ९.४५ वाजता निधन झाले. त्या ८९ वर्षांच्या होत्या. ज्येष्ठ सर्वोदयी विचारवंत अॅड. मा. म. गडकरी यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी (दि. २३) दुपारी ४ वाजता अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.
अंत्ययात्रा गुरुकुल, दाभा येथील निवासस्थानाहून निघेल. सुधाताईंच्या मागे मुलगा अॅड. वंदन गडकरी आणि तीन मुली असा परिवार आहे. सुधाताईं यांनी नागपूर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य, खादी ग्रामोद्योग मंडळाच्या उपाध्यक्ष, नागपूर जिल्हा महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्ष, ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या माजी सदस्य आदी पदावर काम केले होते.