

नागपूर : प्रभाग २ मधील विविध हजेरी स्थळांना भेटी दिल्यानंतर अनेक सफाई कर्मचारी गैरहजर असल्याचे आढळून आले. स्वच्छता निरीक्षक व जमादार योग्यरितीने देखरेख करीत नसल्याचे दिसून आल्याने जमादारासह तिघांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. 24 तासात उत्तर न आल्यास शिस्तभंगानुसार कारवाई केली जाणार आहे.
आशीनगर झोनमधील प्रभाग क्रमांक २ मधील रंगारी यांच्या अखत्यारित असलेल्या हजेरी स्थळावर ३० सफाई कामगार गैरहजर असल्याचे आढळून आले. त्याचप्रमाणे स्वच्छता जमादार असलेल्या अनुप समुद्रे यांच्या अखत्यारितील हजेरी स्थळावर २६ सफाई कर्मचारी गैरहजर असल्याचे आढळून आले. दुसरीकडे जमादार मनोज मलिक यांच्या नियंत्रणातील हजेरी स्थळावर ४ सफाई कर्मचारी कोणतीही सूचना न देता गैरहजर असल्याचे आढळून आले.
मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांनी आशीनगर झोन अंतर्गत ही कारवाई केली. आशीनगर झोनचे स्वच्छता निरीक्षक प्रफुल्ल रंगारी व स्वच्छता जमादार अनुप रंगारी व मनोज मलिक यांना कामात कुचराई केल्यावरून कारणे दाखवा नोटीस बजाविली.